पीएनपी संस्थेत दिव्या कुंभार ९३% गुण मिळवून प्रथम

पीएनपीच्या सर्व शाळांचा निकाल १००%

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्हयातील सर्व पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे.

पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमांमध्ये कर्जत तालुक्यातील माध्यमिक शाळा सुगवेची विद्यार्थिनी दिव्या मारुती कुंभार ९३ टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम आली. माध्यमिक शाळा वडवलीची विद्यार्थिनी विधी दिलीप गुहागरकर ९१ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर माध्यमिक शाळा वेश्वी गोंधळपाडा ची विद्यार्थिनी पूजा तानाजी शिंदे ९०.२० टक्के गुण मिळवून तृतीय आलेली आहे. तर इंग्रजी माध्यमांमध्ये होली चाईल्ड इंग्लिश मिडियम स्कूल वेश्वीचा विद्यार्थी भावार्थ मंगेश पेठारे ९२.२० टक्के गुण मिळवून प्रथम, खालापूर तालुक्यातील जाखोटिया इंग्लिश मिडियमची रक्षा देवेंद्र यादव ९१.०६ द्वितीय तर गणेश सुखदेव थोरात ९० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

माध्यमिक शाळा वेश्‍वी गोंधळपाडा १०० टक्के, माध्यमिक शाळा पळस रोहा १०० टक्के, माध्यमिक शाळा संदेरी म्हसळा १०० टक्के, माध्यमिक शाळा पाष्टी म्हसळा १०० टक्के, माध्यमिक शाळा केलटे म्हसळा १०० टक्के, माध्यमिक शाळा बीड कर्जत १०० टक्के, माध्यमिक शाळा वडवली १०० टक्के, माध्यमिक शाळा खारपाले १०० टक्के, माध्यमिक शाळा जांबरुंग १०० टक्के, माध्यमिक शाळा सुगवे १०० टक्के, माध्यमिक शाळा कुसुंबले १०० टक्के, माध्यमिक शाळा वायशेत १०० टक्के, माध्यमिक शाळा मोठीजुई १०० टक्के, माध्यमिक शाळा भेंडखळ, माध्यमिक शाळा केळ्टे १०० टक्के, माध्यमिक शाळा तळाघर १०० टक्के, माध्यमिक शाळा वडशेत वावे १०० टक्के, माध्यमिक शाळा काकळघर, माध्यमिक शाळा मिठाघर १०० टक्के, होली चाईल्ड इंग्लीश मिडीअम स्कूल वेश्‍वी १०० टक्के, तर जी. जे. इंग्लीश मिडीअम स्कूल खालापूर शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींकडून अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version