। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर्स असो.च्यावतीने परिसरातील डॉक्टरांसाठी रविवारी (दि.5) पनवेलजवळील महात्मा फुले महाविद्यालयात क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खारघर फिनिक्स संघाने तळोजा टायगर्स या संघावर मात करत विजयश्री खेचून आणली. यावेळी मालिकावीर म्हणून डॉ. क्षितिज, उत्कृष्ट फलंदाज डॉ. अनिकेत भोईर, उत्कृष्ट गोलंदाज डॉ. नबिल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक डॉ. असीम पटेल आदींची निवड करण्यात आली.
पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असो.चा स्पर्धा 4 व 5 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पाडल्या. शनिवारी (दि.4) सर्व डॉक्टरांसाठी कॅरम, बुद्धिबळ व बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दुसर्या दिवशी डॉक्टरांसाठी पनवेल डॉक्टर्स प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पनवेल व नवी मुंबईतील 12 संघांनी सहभाग घेतला होता. यात प्रामुख्याने खारघर फीनिक्स, उलवे युनायटेड, खारघर वॉरियर, सिद्धी खारघर, नेरूळ चॅम्पियन्स, तळोजा टायगर्स, पनवेल प्राईड, कर्नाळा वॉरियर्स, कामोठे किंग, पीडीजीपी टायगर्स, करंजडे वॉरियर्स, पनवेल वॉरियर्स आदींनी भाग घेतला होता.
या पीडीजीपीए क्रिकेट सामन्यांचे आयोजन अध्यक्ष डॉ. वैभव मोकल, उपाध्यक्ष डॉ. वैष्णवी नाईक, सचिव डॉ.विवेक महाजन, खजिनदार डॉ. संदेश बहाडकर, डॉ. सुदर्शन मेटकर, डॉ. वैभव पाटील, डॉ. मिलिंद टिपणीस, डॉ. वसंत पाटील व डॉ. सचिन मोकल आदींनी यशस्वीरित्या पार पाडले.