| पाली | वार्ताहर |
ईद-ए-मिलादुनबीच्या पवित्र दिनानिमित्त मुस्लिम सोसायटी डेव्हलपमेंट ग्रुप पाली आणि नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री समर्थ वृद्धाश्रम, परहूर, अलिबाग येथे विशेष समाजकार्याचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम विशेषतः या दिवशी मानवतेसाठी पैगंबर हजरत मोहम्मद (स.) यांनी दिलेला संदेश पसरवण्यासाठी करण्यात आला. या पवित्र हदीसच्या आधारे वृद्धाश्रमातील सर्व जेष्ठ नागरिकांना जेवण देण्यात आले तसेच फळांचे वाटप करण्यात आले. केवळ अन्नदानच नव्हे, तर त्यांच्यासोबत वेळ घालवून त्यांचे अनुभव ऐकण्याचे महत्त्वाचे कार्य केले गेले, जेणेकरून त्यांना मानसिक आधार मिळू शकेल.