डॉ. नानासाहेबांची जयंती साजरी

| वाघ्रण | वार्ताहर |

सेवाश्रम सामाजिक विकास सेवा संस्था वाघ्रणतर्फे थोर निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची 102 वी जयंती मंगलाचरण आणि प्रार्थनेने प्राथमिक शाळेच्या सभागृहात शुक्रवारी (दि.1) सकाळी 9.00 वाजता करण्यात आली. यावेळी डॉ. विभूषा पाटील, सुशिल पाटील यांनी दीप प्रज्वलन व शिवछत्रपती संत रामदास स्वामी समर्थांची प्रतिमेचे पूजन केले. सेवाश्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी डॉ. विभूषा पाटील, सुशिल पाटील यांनी श्री समर्थ प्रतिष्ठन करीत असलेल्या कार्याचा आढावा दिला. तसेच श्री समर्थ सेवक महिला वर्गाला डॉ. विभूषा यांनी आजारांविषयी मार्गर्शन केले. यावेळी सेवाश्रमचे राजेंद्र पाटील, हेमंत पाटील, गिरीश पाटील, अनिल पाटील, नितीन पाटील, विलास पाटील, अजित पाटील यांच्यासह अनेक समर्थ सेवक महिला पुरुष उपस्थित होते. विलास पाटील यांनी श्री समर्थ रामदासांच्या श्लोकाने सांगता केली.

Exit mobile version