सफाई कर्मचारी नागरिकांशी घालतात वाद
| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली खालापूर क्षेत्र हा घाट शेत्र असल्याकारणाने ह्या क्षेत्रात प्रचंड पाऊस होत असतो. पावसाळा जवळ आलेला असताना सुद्धा खोपोली नगरपरिषद प्रशासनाने अजूनही शहरातील नाल्यांची साफसफाई केलेली नाही. सदर नाले आणि गटार साफ करण्याकरिता आम आदमी पार्टीकडे नागरिकांच्या प्रचंड प्रमाणात तक्रारी येत आहेत. आम आदमी पार्टीचे पदाधिकारी सदर गटारी साफ करण्याकरिता नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी अर्ज करीत असतात.
शिळफाटा येथील शंकर मंदिर रोड येथील गटार साफ करण्याकरिता आम आदमी पार्टीने तक्रार केली होती. सदर तक्रारीबाबत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले व सफाई केली नाही हे निदर्शनास आणून दिले असता नगर परिषदेचे सफाई कर्मचारी हे नागरिकांशी उद्धटपणे वागतात व वाद विवाद करतात. आम आदमी पार्टी तर्फे सदर कर्मचार्यांवर कारवाई करावी अशी मागणी मुख्याधिकारी यांना करण्यात आलेली आहे असे डॉ. पठाण यांनी सांगितले