अंमली पदार्थांची विक्री करणार्‍यास अटक

। अलिबाग । वार्ताहर ।
खालापुर मधील पटेलनगर येथे अंमली पदार्थांची विक्री करणार्‍यास अटक करण्यात आली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे दि.28 ऑक्टोबर रोजी आरोपी रा.पटेलनगर, खोपोली, ता.खालापुर याच्या ताब्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल पान मसाला व व्ही-1 सुगंधीत तंबाखु आढळून आला. त्याचे सेवन आरोग्यास अतिशय घातक असून ते गुंगीकारक पदार्थ आहत व त्याचे सेवन केल्याने गंभीर दुखापत होऊ शकते याची पुर्ण जाणीव व ज्ञान असतानाही स्वत:चा आर्थिक फायदा करुन घेण्याच्या उद्देशाने सदरचा माल विक्री करतानाच्या स्थितीत सापडला. सदर गुन्ह्यातील आरोपी यास दि.28 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील एकूण 4 हजार 840 रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सपोनि/श्री.आस्वर हे करीत आहेत.

Exit mobile version