| पनवेल | वार्ताहर |
तळोजा परिसरात गाड्यांचे प्रमाण वाढले आहेत. तळोजा परिसरात एक अज्ञात चोराने एकाच रात्री तब्ब्ल 13 व्हॅगनार गाड्यांमधील इंजिन पार्ट चोरून नेले आहेत. या पार्टची प्रत्येकी किंमत 5000 प्रमाणे 70,000 रुपयांचे पार्ट चोराने लंपास केले आहेत. इरफान मैफूज शेख (43, तळोजा फेज-01) यांची मारूती व्हॅगनार गाडी नं- MH 03 BC 2363 व गाडी नं चक MH 05 BJ 0865 ह्या गाड्या मन्नत अपार्टमेंन्ट, तळोजा फेज-02 या बिल्डींगच्या समोरील सार्वजनिक रस्त्यालगत पार्क करून ठेवल्या होत्या. या गाड्यांमधील तसेच तळोजा फेज-01 व फेज-02 परिसरामध्ये असलेल्या 13 मारुती व्हॅगनार गाड्यांमधील इंजिन पार्ट अज्ञात चोरटयाने चोरून नेले आहेत.