| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंतायत हद्दीतील सुपेगाव जवळील फणसाड अभयरण्यात आज गौतम बुध्द यांच्या जयंतीचे औचित्य साधुन फणसाड अभयरण्यातील प्राण्यांची गणना सुरुवात करण्यात येते.
सुमारे 54कि. मी. क्षेञ परिसरात फणसाड अभयअरण्य क्षेञाचा विस्तार झालेला आहे. नवाब सरकाराने हे अरण्य स्वातंञ्य पुर्व काळापासुन सरंक्षीत केलेला आहे. या अभय अरण्यात 17 प्रकारचे वन्यप्राणी यामध्ये बिबट्या, सांबर, भेकरे, डुक्कर, षेकरु, पिसोरी, ससा, कालामांजर, रानमांजर, जवादा, सालिंदर, मुंगा, वानर, मोर, गिधाड, आदि प्राण्यांचे वास्तव्य आहे. तसेच या अभयरण्यात 718 प्रकारचे वृक्ष, 17 प्रकारचे सस्तन प्राणी, 27 प्रकारचे साप, 164 प्रकारचे रंगी-बेरंगी पक्षी, 90 प्रकारची फुलपाखरे या मध्ये ब्लु मॉरमॉन, मॅप, व आदि फुलपाखरु दिसून येतात या बरोबर नाग, फुरुस, घोणस, मण्यार, वायपर असे विषारी व हरणटोळ, अजगर सारखे बिनविषारी साप येथे आढळतात.