पर्यावरणपूरक गणपती आरास व गौरी सजावट स्पर्धा

| कोर्लई | वार्ताहर |

राष्ट्रवादी काँग्रेस व सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित पर्यावरणपूरक गणपती आरास व गौरी सजावट स्पर्धा (मुरुड शहर मर्यादित) आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

गणपती आरास स्पर्धा सजावटीचे विषय: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (देशभक्तीपर) विशद करणारी सजावट, मुरुडचे वैशिष्ट्ये वर्णन करणारी सजावट, पर्यावरणविषयक जागरुकता दर्शविणारी सजावट, ऐतिहासिक, पौराणिक व धार्मिक गोष्टींवर सजावट.

यातील विजेत्या प्रथम, द्वितीय, तृतीव उत्तेजनार्थ विजेत्यास अनुक्रमे पाच, तीन, दोन व एक हजार रुपये रोख व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे 30 ऑगस्टपर्यंत नोंदवावी.

अधिक माहितीसाठी विजय पैर 9273302413, राकेश मसाल 8668529110, मनिष माळी 8805670948, जगदीश आंबुकर 8788162548, श्रेयस सरपाटील 9049877038, दीपक राजपुरकर 9272414673 यांच्याशी, तर गौरी सजावट स्पर्धेसाठी विश्‍वा वर्तक 8087227331, जुईली गुंजाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version