माजी विद्यार्थ्यांकडून माजी शिक्षकांचा सत्कार

| गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील नवजिवन प्रसारक मंडळ खांब संचालित श्री.रा.ग पोटफोडे (मास्तर )विद्यालय व कै.द.ग.तटकरे कनिष्ठ महाविद्यालय खांब या विद्यालयातील सन 1998-99 मधील माजी विद्यार्थ्यांकडून माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याबरोबर या विद्यालयास 12 सिलिंग फॅन देण्यात आले. शनिवार (दि.1) हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी अलंकार अधिकारी, मनोज म्हसकर, सुशिल परबळकर, अमोल पारठे, उर्मिला पोटफोडे, तुकाराम चितळकर,नितीन सानप, निलेश म्हसकर. प्रतिक्षा ढमढेरे, प्रियांका ढमढेरे, मंजूला पिंपळकर,मुकेश मोरे, विनायक पिंपळकर, शर्मिला, संजीवनी जाधव, संतोष भोसले, सुगंधा ढाणे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.

तसेच संस्थेचे महेंद्र पोटफोडे, राम कापसे, धोंडू कचरे, प्रकाश थिटे, रामचंद्र चितळकर, माजी शिक्षक धनवी, खांडेकर,भोसले, म्हात्रे आर जी, म्हात्रे बी.पी., मुख्यध्यापक जंगम, धामणसे, तुपकर, चाटाले, पोटफोडे , योगेश धामणसे, श्रीमती घरट, श्रीमती म्हसकर, श्रीमती घरत, श्रीमती वरखले, श्रीमती लोखंडे, श्रीमती धनावडे, श्रीमती कळमकर , सचिन कांबळे उपस्थित होते.

Exit mobile version