| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वेश्वी येथे संकुलाच्या सभागृहात रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पीएनपी माध्यमिक शाळा वेश्वीचे मुख्याध्यापक निलेश मगर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र पाटील, बी. एड. कॉलेजचे प्राचार्य नितीश मोरे, पी.एन.पी होली चाईल्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, उपमुख्याध्यापिका सदाफ शाहबाजकर, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक आदि उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना निलेश मगर यांनी सांगितले की, पावसाळ्याच्या दिवसात रानात अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक खाण्यायोग्य महत्वाच्या भाज्या उगवतात, अशा प्रकारच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना भाज्यांची माहिती मिळते आणि स्थंनिकांना रोजगार उपलब्ध होतो. सध्या फास्ट फूड खाण्याच्या काळात रानभाज्या, रानभाज्यांची ओळख आणि त्याचे फायदे पटवून दिले. या भाज्या पोस्टिक खाद्य म्हणून वर्षातून एकदा तरी खाव्यात. रानभाज्यांच्या माध्यमातून माणसाच्या शरीराला होणारे फायदे, शरीराला मिळणारे लोह, जीवनसत्वे याविषयी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रदर्शनात पानफुटी, अडुळसा, भारंग, तुलसी, टाकला, कोयरेल, आळू, मेथी, माठ, तुळस, झेंडू, जॅस्मिन आणि इतर आयुर्वेधिक दृष्ट्या आरोग्यासाठी महत्वाच्या असणार्या पानं आणि फुले यांची 12 वीच्या विद्यार्थ्यानी माहिती पठवून दिली. सदर प्रदर्शन पाहण्यासाठी संकुलातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रा. ऐमन फैज डबीर यांनी विशेष मेहनत घेतली.