| बार्बाडोस | वृत्तसंस्था |
विंडीजविरुद्ध पहिलीच कसोटी खेळून क्रिकेटविश्वात पदार्पण करणाऱ्या भारताच्या यशस्वी जैस्वाल याने दणदणीत शतक ठोकले. विंडिजच्या भूमीवर अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय सलामीवीर ठरला. भारतीय संघाने पहिल्या डावात 2 बाद 312 धावा केल्या आहेत. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (143) आणि विराट कोहली (36) नाबाद आहेत. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी पदार्पणाच्या कसोटीत सलामीवीर म्हणून शतके झळकावली आहेत पण हे शतक मायदेशातील कसोटी मालिकेत आले आहेत. याशिवाय पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा यशस्वी एकूण भारतीयांपैकी 17वा फलंदाज ठरला आहे. म्हणजेच त्याच्या आधी भारताच्या 16 फलंदाजांनी पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावली आहेत.