| मुंबई | वार्ताहर |
अजित पवार उपमुख्यमंत्री होताच पुण्यातील लवासा प्रकरणात पुन्हा चर्चेत आले आहे. लवासा प्रकरणाची सुनावणी तातडीनं घेण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. लवासा प्रकरणी पुढची सुनावणी 21 जुलैला मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याने ते लवासा प्रकरणातील कागदपत्रात फेरफार करू शकतात त्यामुळे लवकरात लवकर या प्रकरणाची सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी केली होती. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानं ते लवासा प्रकरणातील कागदपत्रात फेरफार करू शकतात, फायलींना आगही लागू शकते, तपास प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकतात त्यामुळे तत्काळ सुनावणी घ्या याचिकाकर्तेंनी न्यायालयाला विनंती केली होती. न्यायालयाने विनंती मान्य करून 21 जुलैला पुढील सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.