| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील थळ येथील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स (आरसीएफ) कंपनीच्या हेवी वॉटर प्लांटमध्ये स्फोट झाल्याने अपघात होवून एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. तर या अपघाताचा परिणाम होवून अन्य एका कर्मचाऱ्याला मानसिक धक्का बसला आहे.
आरसीएफ कंपनी कॉम्प्रेसर हाऊसमध्ये स्फोट
सकाळी ८ च्या सुमारास ही घटना घडली. विजय माळी असे या अपघातात जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे. त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावर अमाईड केमिकल उडून चेहरा भाजला आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे सिद्धेश भगत हा कर्मचारी प्रचंड घाबरल्याने त्याला जबर मानसिक धक्का बसला आहे.
आरसीएफ कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता तांत्रीक अडचणीमुळे त्यांच्याशी बोलता आले नाही. दरम्यान या घटनेमुळे कंपनीच्या दुर्लक्षामुळे असे अपघात होत असल्याने कामगार वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.