हेड-शर्माची विस्फोटक फलंदाजी

हैदाराबादेत अक्षरशः धावांचा पाऊस

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्सवर आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 57 व्या सामन्यात 10 गड्यांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादने हे आव्हान 9.4 षटाकांमध्ये सहज पूर्ण केलं. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने विस्फोटक फलंदाजी करीत धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. त्यामुळे हैदराबादला 10 षटाकंच्या आतच विजय मिळवता आहे.
ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडी मैदानात येताच विस्फोटक फलंदाजी केली आणि विजय मिळवूनच विश्रांती घेतली. या दोघांनी पावर प्लेमध्येच 100 धावा जोडल्या. त्यानंतर दोघांनी आपला दांडपट्टा कायमच ठेवला. या दोघांनी 9.4 षटकांमध्ये 167 धावांची नाबाद सलामी विजयी भागीदारी केली. अभिषेक शर्मा याने 6 षटकार आणि 8 चौकारांसह 267.86 च्या स्ट्राईक रेटने 75 धावांची नाबाद खेळी केली. तर ट्रेव्हिस हेड याने 30 चेंडूंमध्ये 8 षटकार आणि 8 चौकारांसह 296.67 च्या स्ट्राईक रेटने 89 धावा केल्या. या दोघांनी लखनऊच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.

Exit mobile version