गोवे-कोलाड । वार्ताहर ।
दिवसेंदिवस बदलत्या युगात शेतकरी बांधवांनी पारंपरिक भात शेती लागवड न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विविध पीक घेत त्याचा व्यवसाय सुरू केले पाहिजे शेतकरी हाच खरा जगाचा पोशिंदा आहे भात पिकांबरोबरच कडधान्य,नाचणी,वरी,दलीतपिक,विविध प्रकारची भाजी लागवड फळबागायत कुकुट पालन शेळ्या व्यवसाय पशुसंवर्धन पशु पालन,दुग्धव्यवसाय,मस्त व्यवसाय आदी व्यवसायात लक्ष केंद्रित करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेती व्यवसाय करा असे प्रतिपादन रोहा कृषी केंद्र विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी डॉ मनोज तलाठी यांनी खांब येथे केले.
शेकरीवर्गाला मार्गदर्शन करत पुढे म्हणाले की गेली दोन वर्षे कोरोना काळ आला सारे उद्योग धंदे बंद झाले मात्र बळीराजा सार्यांची भूक भागवण्याचे काम करत होता. बदलत्या युगात मोबाईल ऐप डाउनलोड करा संपूर्ण जगात शेती कशी केली जाते याच आवलंबन करा. डोक्यावर ओझे वाहून नेण्याचा काम आता करू नका डोक्यावरच काम करायला शिका डोके लावून तंत्रज्ञान वापरा युवकांनी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अधिक शेतीविषयक मार्गदर्शन घ्या असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.
आयोजित प्रदर्शनात विविध प्रकारच्या रानभाज्या त्याच बरोबर शेतीसाठी लागणारे बियाणे व त्यांची माहिती, शेती विषयी अँप,एकात्मिक कीड व त्याची पध्दती त्यावरील उपाय आशा विविध प्रकारचे प्रदर्शन आयोजित केले होते तर उपस्थित शेतकरी वर्गाने याचा लाभ घेतला. प्रसंगी मानसी चितळकर व कृषी विद्यापीठ केंद्र रोहा येथील विषय विशेषज्ञ कृषी विस्तार अधिकारी डॉ. प्रमोद मांडवकर, डॉ. मांजरेकर, प्रकाश थिटे,दत्ता वातेरे,मनोज सावरकर,वंदना चितळकर, रंजना वेदक रंजना टवले, सुप्रिया अधिकारी,दिलीप मोहिते,दिलीप लाडगे, हे उपस्थित होते.