| मुंबई | प्रतिनिधी |
राज्याच्या कृषी पुरस्कार सोहळ्यात राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम नियोजित होता. मात्र, या कार्यक्रमाला उशीर झाल्याने तसेच राज्यपालांकडून अत्यंत कमी वेळ देण्यात आल्याने नाराज शेतकर्यांनी गोंधळ करण्यासा सुरूवात केली. यावेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकर्यांची समजूत काढली. यावेळी नाराज शेतकर्यांनी मात्र गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले.
हा कार्यक्रम वरळीतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम) येथे पार पडला. दरम्यान, कार्यक्रमाला उशीर झाल्याने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते काही शेतकर्यांना पुरस्कार देण्यात आला. यानंतर राज्य शासन देत असलेला पुरस्कार आम्हाला राज्यपालांच्या हस्तेच हवा आहे, असं शेतकर्यांचं म्हणणं होते. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी शेतकर्यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊ, असे आश्वासन दिल्यामुळे शेतकरी शांत झाले. पण याआधी शेतकर्यांनी फेटे स्टेजच्या दिशेने फेकत गोंधळ घातल्याचा पाहायला मिळाले. या पुरस्कार सोहळ्यात राज्य शासनातर्फे सन 2020 ते 2023 या वर्षीच्या 448 पुरस्कार्थींचा पुरस्कार वितरण व सत्कार करण्यात आला. नऊ विभांगामध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी आणि कर्मचारी यांना कृषी सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल.