कापूर कंपनीच्या सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| खोपोली | प्रतिनिधी |

केमिकल्सयुक्त कापूर उत्पादन करणाऱ्या मंगलम ऑरगॅनिक्स कंपनीच्या मागच्या बाजूला सूर्यकांत गायकवाड यांची शेती आहे. शेतामध्ये अनेक वर्षांपासून प्रदूषित सांडपाणी राजरोसपणे सोडल्यामुळे शेतात काळ्या पाण्याचे डबके साठल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अनेक वर्षांपासून कंपनी व्यवस्थापन आरेरावी करीत आहे. याविरोधात भीमशक्ती संघटनेचे बैठा सत्याग्रह आंदोलन संस्थापक सरचिटणीस गोपाळ तंतरपाळे यांनी तहसील कार्यालयासमोर गुरूवार, दि.6 नोव्हेंबर रोजी केले होते. तहसीलदार अभय चव्हाण यांनी आंदोलनाची दखल घेऊन प्रदूषण मंडळ आणि कृषी विभागाला नुकसानीची पाहणी करण्यासाठी पत्र दिले होते. प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी शिवानंद बसवडे यांनी 12 नोव्हेंबर रोजी शेतीची पाहणी करून शेतामधील केमिकल्सयुक्त काळे पाणी तपासणीसाठी घेऊन गेले आहे.

गेल्या 25 वर्षांपासून कंपनीचे प्रदूषित सांडपाणी माझ्या शेतात सोडल्यामुळे शेती नापीक झाली आहे. प्रदूषण मंडळाकडे अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नसून, कंपनी मालक हा पाणी कंपनीतील नसून गावच्या नाल्याचे असल्याचे सांगून जबाबदारी टाळत आहे. परंतु, माझ्या शेतीची नुकसान करणाऱ्या मंगलम कंपनीवर कारवाई केली नाहीतर शेताच आत्मदहन करणार असल्याचा इशारा बाधित शेतकरी सूर्यकांत गायकवाड यांनी दिला आहे. तर, शेतकरी सूर्यकांत गायकवाड यांच्या शेताची पाहणी करून पाणी तपासणीसाठी घेतले आहे. कंपनीची पाहणी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार असल्याची माहिती प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी शिवानंद बसवडे दिली आहे.

Exit mobile version