| उरण | वार्ताहर |
वातावरणातील बदलामुळे व डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या उरण तालुक्यात ताप, सर्दी, खोकला,काविळ आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. सदर रुग्ण हे सर्रासपणे खाजगी रुग्णालयात उपचार करुन घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.
परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातल्याने ठिक ठिकाणच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. त्यात सध्या वाढते तापमान व आर्द्रता यामुळे उरण तालुक्यातील रहिवाशांना ताप, सर्दी, खोकला, काविळ यांनी ग्रासले आहे. तसेच ठिक ठिकाणी ओसाड जागेवर, डबक्यात, घरा जवळील उघड्या गटारात पाणी साचून राहत असल्याने डासाची संख्या बळावली आहे. हे डास चावत असल्याने डेंग्यू चे रुग्ण आढळून आले आहेत.
सदर रुग्ण हे सर्रासपणे खाजगी रुग्णालयात उपचार करुन घेण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. तरी उरण तालुक्यातील व रायगड जिल्हा परिषदे मधिल आरोग्य विभागाकडून रुग्णांना तातडीने उपचार करुन घेण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक मंडळी करत आहेत.