। मुंबई । प्रतिनिधी ।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सातवा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातून त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात नऊ क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
कृषी क्षेत्रातील उत्पादकता: कृषी आणि त्याच्यासंबंधित क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात येत आहे. नैसर्गिक शैती व्हावी, यासाठी अर्थसंकल्पात भर दिल्याचं सीतारमण यांनी सांगितलं. तसेच पीएम गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांसाठी वाढवली आहे.
रोजगार आणि कौशल्य: रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, एमएसएमई आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 5 वर्षांच्या कालावधीत 4.1 कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी 5 योजना जाहीर मोदी सरकारकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच, पुढच्या पाच वर्षात एक कोटी तरुणांना टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळणार आहे.
सर्वसमावेशक मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय: आदिवासी समुदायाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीच्या सुधारणेसाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान सुरु केले जाईल. ही योजना आदिवासी बहुल गावांसाठी असून यासाठी 2 लाख कोटींचा निधी दिला जाणार आहे.
उत्पादन आणि सेवा: उत्पादन आणि सेवाराज्यांना 15 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे.
शहरी विकासाला चालना देणे: 100 शहरांमध्ये स्ट्रिट मार्टके सुरु केले जाणार आहेत. शहरातील 1 कोटी गरिबांसाठी आवास योजना राबवली जाणार तर, 1000 शहरात स्वच्छ पाणी योजना आणली जाणार आहे.
ऊर्जा सुरक्षा: पंतप्रधान सूर्यघर योजना राबवण्यात येणार आहे.
पायाभूत सुविधा: पाटना ते पुर्णिया एक्स्प्रेस-वे, बोधगया-राजगीर-वैशाली-दरबंगा एक्स्प्रेस-वे, बक्सर-बागलपूर एक्स्पेस-वे बांधले जाणार आहेत. तर, 25 हजार गावे पक्क्या रस्त्याने जोडले जाणार आहेत.
नवकल्पना, संशोधन आणि विकास: 1 कोटी शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेतीची योजना आणली जाणार आहे.
पुढच्या पिढीतील सुधारणा: 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. यासाठी 5 हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन आणि 6 हजार एकरकमी पैसे मिळतील. शैक्षणिक कर्जामध्ये 3 टक्के सवलत दिली जाणार आहे.
तसेच, महिलांच्या विकासासाठी 3 लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.