| रसायनी | वार्ताहर |
रसायनी औद्योगिक वसाहतीमधील कैरे गावाजवळील एसपीआर फार्मा कंपनीला आग लागल्याने कंपनीच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.
आगीचे कारण अद्याप समजले नसले तरी कॉस्मेटीक उत्पादन तयार करण्यासाठी रॉ मटेरिअल बनविण्याच्या मालाचे आगीत नुकसान झाल्याचे समजते. यावेळी आग आटोक्यात आणण्यासाठी पाताळगंगा अग्निशमन दल, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी, खोपोली नगरपालिका यांच्यासह एकूण सहा अग्निशमन बंबाच्या जवानांनी प्रयत्न केले. जीवितहानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. साडेतीन तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. घटनास्थळी तहसीलदार अभय चव्हाण, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्यासह पोलीस घटनास्थळी उपस्थित होते.