पाच वर्षीय स्पृहाचे निधन

। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत पोयनाड हद्दीतील भाकरवड गावचे नरेंद्र पाटील यांची मुलगी स्पृहा पाटील हिचा गुरुवार दि 18 नोव्हेंबर 2021 रोजी निधन झाले. स्पृहा ही ज्युनियर केजी मध्ये नोहाज आर्क इंग्लिश मिडीयम मध्ये शिकत होती खूप तल्लीन बुद्धी आणि सर्वांशी हसतमुख असायची दोन अडीच वर्षा पूर्वी नॉर्मल ताप आला होता. परंतु दुसर्‍या दिवशी पहाटे पेण येथील अंकुर हॉस्पिटलमध्ये पुन्हा ट्रीटमेंट साठी वडील नरेंद्र व आई घेऊन गेली तेथून पनवेल येथील डॉ. मोहिते हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले या प्रोसेस साठी जवळजवळ पाच ते सहा लाख रुपये निघून गेले होते पण फरक काही पडला नव्हता. तीला टाटा मेमोरियल मध्ये नेण्यात आली व तिथे रक्ताच्या सर्व टेस्ट केल्यानंतर आजाराचे निदान स्पष्ट झाले. तरीही आपल्या मनाची एकाग्रता ठेऊन तिच्यावर उपचार सुरूच ठेवले. हे सर्व दोन ते अडीच वर्षे चालू होते मात्र गुरुवार दि 18 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास स्पृहाची प्राणज्योत मावळली.

Exit mobile version