दुर्गादेवी मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त कार्यक्रम
| अलिबाग | वार्ताहर |
हाशिवरे येथे दुर्गादेवी मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सचिन धुमाळ म्युझिक अकॅडमी प्रस्तुत बासरी रंग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रीय संगीतावर आधारित सचिन धुमाळ बासरी, प्रतिक नाईक तबला आणि निमिष जुईकर पखवाज यांच्या जुगलबंदीने झाली. ‘अच्युतम केशवम’ हे दुसरे गाणे सर्व बासरी वादकांकडून सादर करण्यात आले. रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवताना स्वप्निल धुमाळ यांच्या माऊथ ऑर्गनवर सादर केलेल्या ‘प्यार दिवाना होता है’ या गाण्याने रंगत आणली. बासरीवर सादर केलेल्या सचिन धुमाळ यांच्या ‘आई तुझं देऊळ’ या गाण्याने वन्स मोअर मिळवताना महिला प्रेक्षकांनी नृत्याची संधी सोडली नाही. ‘हम तेरे बिन अब’ या जान्हवीने बासरीवर सादर केलेल्या गाण्यानंतर ‘सायोनारा सायोनारा’ हे सर्व कलाकारांनी सादर केलेल्या गाण्याने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. सर्व कलाकारांना हाशिवरे ग्रामस्थांच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.