| पनवेल | प्रतिनिधी |
कारचे अपहर करून नेल्याप्रकरणी दानिश आजम सय्यद याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तौसिफ खोत हे पेण येथे राहात असून, त्यांचा करंजाडे येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे 25 कार आहेत. दानिश आजम सम्पद यांच्या ताब्यात व्हॅगन आर कार एम एच 06 बीडब्ल्यू 9694 ही देण्यात आली. दररोज अकराशे रुपये भाडे द्यायचे असे ठरले होते. भाडे मारून तो कार बिल्डिंगच्या बाहेर लावायचा. नेहमीप्रमाणे त्याला चावी दिली असता तो कार घेऊन भाडे मारण्यासाठी निघून गेला. मात्र, सायंकाळी आला नाही. त्याला फोन केले. मात्र, त्याचा फोन बंद येत होता. त्याचा शोध घेतला असता तो सापडून आला नाही. त्यामुळे कारचा अपहार केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.