| अलिबाग | वार्ताहर |
माजी आ. पंडित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत सांस्कृतिक कलामंच पेझारी-अलिबाग संचलित लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता राजन पांचाळ यांच्या मोफत अभिनय कार्यशाळेचे 1 ते 8 मे रोजी आयोजन करण्यात आले. शेवटच्या दिवशी चित्रपट दिग्दर्शक, संगीतकार विक्रांत वार्डे मार्गदर्शन केले.
नृत्य दिग्दर्शिका सोनाली पवार यांच्याकडून नृत्याचे विविध प्रकार शिकवले. तर राजा अत्रे यांनी अभिनयाचे विविध अंग, पैलू शिकत मुलांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. या कार्यशाळेत डॉ.जुईली टेमकर, देवेंद्र केळूसकर, देवेंद्र पाटील, निनाद पाटील, रणिता पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले. देवेंद्र पाटील यांनी माजी आ. पंडित पाटील, भावना पाटील आणि पाटील परिवारांचे, प्राजक्ता म्हात्रे, नितेश पाटील मुख्याध्यापक रा जि प मराठी शाळा पेझारी, विकास जाधव सामाजिक कार्यकर्ते, तसेच भैरवनाथ मंदिर पेझारीच्या ट्रस्टीं या सर्वांचे आभार मानून प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप केला.