। खरोशी । वार्ताहर ।
पेण शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई वि. देव माध्यमिक विद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले आहे. सलग 14 वर्ष 100 टक्के निकालाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. या विद्यालयातील एकूण 73 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक प्रशांत हंडाळ (98.20 टक्के), द्वितीय क्रमांक मयुरी कोठेकर (97.80टक्के) व तृतीय क्रमांक आर्या जांभळे (95.40 टक्के) हिने पटकावला आहे. विद्यार्थ्यांच्या या स्पृहणीय यशाबद्दल पेण शिक्षण महिला समितीच्या अध्यक्षा, सुहासिनी देव, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संदीप भोर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.