शासकीय मूकबधीर विद्यालयात मोफत प्रवेश सुरू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| रायगड | वार्ताहर |

रायगड जिल्हा व कोकण विभागातील कर्णबधिर मुला-मुलींच्या शिक्षणाच्या सोयीसाठी शासनाने विद्यानगर-अलिबाग येथे शासकीय मूकबधीर विद्यालय सुरू केले आहे.

या संस्थेत 06 ते 16 वयोगटातील मूकबधीर मुला-मुलींसाठी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे मोफत शिक्षण देण्यात येते. प्रवेशित मुला-मुलींसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था आहे. भोजन, वह्या, पुस्तके व शैक्षणिक साधने आदी सुविधा विनामूल्य पुरविण्यात येतात. तरी 6 ते 16 वयोगटातील मुलां-मुर्लीच्या इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी अधीक्षक, शासकीय मूकबधीर विद्यालय, अलिबाग जि. रायगड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शिंदे 9594313179 (प्र.अधीक्षक), वेखंडे 7030390020, बोरकर 9970525345 अधीक्षक शासकीय मूकबधिर विद्यालय, अलिबाग यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version