। मुंबई । प्रतिनिधी ।
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे 16 वर्षाखालील शालेय मुलामुलींची कॅरम स्पर्धा 16 मार्च रोजी विनाशुल्क आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट व सिबिईयु यांच्या सहकार्याने दादर-पश्चिम येथील सिबिईयु सभागृहात होणार आहे.
स्पर्धेचे संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत प्रथम 8 विजेत्यांना आकर्षक चषकासह स्ट्रायकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शालेय खेळाडूंना तज्ञांचे मोफत मार्गदर्शनदेखील मिळणार आहे. तसेच, ही स्पर्धा चॅम्पियन कॅरम बोर्डवर बाद पद्धतीने खेळवली जाणार आहे. प्रत्येक फेरीसाठी चार बोर्डांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. यंदापासून आनंदराव अडसूळ चॅरीटेबल ट्रस्ट क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबविणार असून, एप्रिलमध्ये सबज्युनियर कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी सुपर लीग कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत उदयोन्मुख खेळाडूंना आपली क्षमता दाखविण्याची एक उत्तम संधी मिळणार आहे.