। रसायनी । वार्ताहर ।
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील सिद्धेश्वरी कॉर्नर येथील दिवा अँटिलिया येथे डॉ. प्रतिभा महिंद्रकर यांच्या श्री साई क्लिनिक दवाखान्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गुरूवारी (दि.27) करण्यात आले होते. या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन उद्योजक विजय मुरकुटे व रसायनी पोलीस ठाण्याचे सपोनि माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात हिमोग्लोबीन, ब्लड प्रेशर, अस्थीरोग, रक्तातील साखर पातळी, बी.एम.डी. हाडांची तपासणी, स्त्री रोग तपासणी, त्वचेचे आजार व जनरल तपासणी करण्यात आली. त्यावर मोफत उपचार व मार्गदर्शन श्री साई क्लिनिक तर्फे करण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते. त्यांचे स्वागत देवेंद्र महिंद्रकर व डॉ. प्रतिभा महिंद्रकर यांनी केले.