| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील वारदोली येथील वाधवा वाईस सिटी मॅगनोलिया बिल्डींग परिसरात ठेवलेल्या लाखो रुपये किंमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वायर व इतर साहित्य चोरी केल्याप्रकरणी अवघ्या 24 तासात पनवेल तालुका पोलिसांनी चौकडीला गुन्ह्यातील गाडीसह ताब्यात घेतले आहे. मो. राशिद मो. नाझीम फारूकी (32), मो. साहीद अजगर आली (21), मो. आसिफ मो. रेहमान (24), मो. इम्रान शफीक अहमद फारुकी (43) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या 3 लाख रुपये गाडीने 3 लाख 17 हजार 220 रुपये किंमीची इलेक्ट्रिक वायर व साहित्य व 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन असा एकूण 6 लाख 37 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता.