। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील वाचनालय व तालुका ग्रंथालय अलिबाग तर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त गुरूवारी (दि.27) अलिबाग येथील पत्रकार भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार व जेष्ठ साहित्यिक अनंत देवघरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान साहित्यिक वर्षा कुवळेकर व ग्रंथपाल ज्योती म्हात्रे यांना सन्मानित करण्यात आले.
वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मराठी भाषेचा जागर केला जातो. यानिमित्त गुरूवारी अलिबाग येथील पत्रकार भवनात देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरूवातील कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला हार घालत त्यांना मानवंदना देण्यात आल्या. तसेच, स्व.प्रभाकर पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांनतर या कार्यक्रमाचे औचित्य साधून साहित्यिक वर्षा कुवळेकर व ग्रंथपाल ज्योती म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला. यादरम्यान मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.