शालेय उपयोगी वस्तचूी भेट

| कर्जत | वार्ताहर |

रायगड जिल्हा परिषद शाळा वर्णे ठाकुरवाडी तालुका कर्जत जिल्हा रायगड शाळेला फातिमा नोबेल ट्रस्टच्यावतीने शालेय उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. 1986 च्या बॅचने दोन टेबल, सहा खुर्च्या, एक संगणक संच भेट देण्यात आले. यावेळी कर्जत नगरपालिकेच्या अध्यक्षा सुवर्णा जोशी तसेच सुदेश जाधव यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच भविष्यात मदत करण्याची ग्वाही दिली. यावेळी श्रद्धा फाऊंडेशन वेणगांव येथे मनोरुणगासाठी संस्थेच्या वतीने 20 ब्लँकेट दिल्या. सादर कार्यक्रला प्रशांत परदेशी, संजीव पाटील, मिलापसिंग हिरो श्रीनिवास, ज्ञानेश्वर वाडीले, खंडू कावळे सुरेखा प्रधान आदी उपस्थित होते.

Exit mobile version