। पनवेल । प्रतिनिधी ।
स्पेन येथे 16 ते 20 सप्टेंबर 2021 दरम्यान होणार्या अरनॉल्ड क्लासिक युरोप या बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी भारतातून 17 लोकांची निवड झाली आहे. त्यामध्ये पनवेल तालुक्यातील गिरीश पंढरीनाथ पाटील (खारकोपर गव्हाण) येथील युवकाची निवड झाली आहे. त्याबाबतचे पत्र त्यांना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस यांच्याकडून मिळाले.
सदर बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये संपूर्ण जगातील वेगवेगळ्या देशातील खेळाडू सहभाग घेतात. पनवेल मधील एक होतकरू तरुण देशाबाहेर जाऊन पनवेल बरोबरच देशाचे नाव त्या ठिकाणी वाढविणार आहे. त्याच्या या भावी कारकीर्दीस पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्र, अनंत म्हात्रे, जे.एम.म्हात्रे चॅरीटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे,भगवान घरत, सुहास देशमुख, रमेश ठाकूर, प्रमोद पाटील, जगन्नाथ म्हात्रे, हरिभाऊ पाटील, रामनाथ ठाकूर, प्रकाश भोईर, बी.यू.पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच सदर खेळादरम्यान त्याला आवश्यक त्या सर्व गोष्टींचे सहकार्य जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत करण्यात आले आहे.