। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम धाकू खारपाटील मराठी माध्यमातील आणि ठकुबाई परशुराम खारपाटील इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यात मराठी माध्यमाचा निकाल 94.93 टक्के आणि इंग्रजी माध्यमाचा निकाल 100 टक्के लागला असून दोन्ही माध्यमातून मुलींनीच बाजी मारली आहे.
यावेळी मराठी माध्यमातून भूमिका ठाकूर हिने 95.20 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर, पायल पाटील 90.20 टक्के आणि प्रेरणा पाटील 89.40% गुण मिळवून तिसरी आली आहे. तसेच, इंग्रजी माध्यमाच्या संकुलनातून मानसी जोशी हिने 91.60 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर, सानवी मोकल 91 टक्के गुण मिळवून द्वितीय आणि मोनिका पडवळ 90.60 टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संस्थापक अध्यक्ष पी.पी.खारपाटील, उपाध्यक्ष राजेंद्र खारपाटील, चेअरमन समीर खारपाटील, सचिव सागर खारपाटील, संचालिका अर्चना ठाकूर, प्रशासकीय अधिकारी व्ही.ए. पाटील, प्राचार्य मिलिंद पट्टेबहादूर, पर्यवेक्षक आनंद चिर्लेकर, मुख्याध्यापिका सुप्रिया म्हात्रे, मंदा घरत, स्मिता मसुरकर, विद्या संकुलनाचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.