जखमी हरियालला जीवनदान

| पाली/बेणसे | वार्ताहर |

राज्य पक्षी हरियाल जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला होता. त्यास विळे येथील पर्यावरण प्रेमी तरुण ओंकार नलावडे यांनी उपचार करून जीवनदान दिले. काही दिवसांपूर्वी त्यास हरियाल जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला आढळून आला, त्यांनी त्या पक्षाचे निरीक्षण केले असता त्याच्या डोळ्याला व डोक्याला इजा झाल्याची आढळून आले.


हा पक्षी जखमी कशाने झाली हे कळून आले नाही मात्र पक्षाला वाचवणं महत्वाचे होते. जवळपास 5 ते 6 दिवस त्यांनी आपल्या फार्म हाऊसवर ठेऊन त्याच्यावर औषधउपचार केले आणि त्यास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

दुर्मिळ असा हरियाल पक्षी ज्याला इंग्रजीमध्ये येलो फुटेड ग्रीन पिजन तर शास्त्रीय नाव ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा असे असून या पक्षाला काही ठिकाणी पिवळ्या पायाची हारोळी देखील म्हणतात. 1 ते 7 ऑक्टोबर हा महाराष्ट्रात सर्वत्र वन्यजीव सप्ताह राबवणे चालू असतांनाच ही एक सुखद घटना घडली आहे.

राम मुंढे, निसर्ग अभ्यासक, विळे
Exit mobile version