खोपोली | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील गोदरेज अँड बॉईस मॅन्यु. कं. ली. ,तांबाटी,या कंपनी च्या माध्यमातून ग्रामपंचायत विभागात अनेक विकास कामे केल्याने ग्रामपंचायत तांबाटी ग्रामपंचायतीतर्फे कंपनीचा सत्कार केला.
महिला सक्षमीकरण व बाल विकास, तांबाटी आणि वडवळ ग्राम पंचायत मध्ये 52 महिला बचत गटासोबत सक्षमीकरण कार्यक्रम यात 530 महिला लाभार्थी यांचा समावेश आहे. महिला स्वयंरोजगार व उद्योजकता विकास कार्यक्रम मध्ये 15 पेक्षा अधिक महिला गृह उद्योग उभारणी आणि 40 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला, बाल विकास 0-5 वय गटातील मुलांना पोषण आहार , मातांना आहार प्रशिक्षण , नव विवाहित जोडप्यानं कुटंब नियोजन बाबत मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. पेय जल उपक्रम – वडवळ व तांबाटी मध्ये 6 पाणी साठवण टाक्या ,4 चेक डॅम, 1 विहीर ,5 वॉटर फिल्टरेशन युनिट्स उभे केले.
21 प्राथमिक आणि माध्यमिक शाळा ना डिजिटल क्लास रूम चे सहकार्य केले 17 शाळा मध्ये इंग्रजी वर्ग साठी सहकार्य केले. ग्रामपंचायती सोबत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वावोशी यांच्या माध्यमातून लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात आली आहे.त्यांनी ग्रामपंचायत व विभागासाठी केलेल्या कामाचे कौतुक म्हणून सरपंच अनिल जाधव व सदस्य यांनी कंपनी चा गौरव केला.