गोमाशी माघी गणेशोत्सव साजरा

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

गोमाशी येथे श्री अखंड हरिनाम यज्ञ व गणेश जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन सोमवारी व मंगळवारी रोजी करण्यात आले. या उत्सवानिमित्त ज्ञानेश्‍वरी पारायण, काकडा, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, भजन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी रात्री महेश देशमुख यांचे कीर्तन झाले. मंगळवारी सकाळी गणेश पूजन, जन्माचे किर्तन अशोक शिंदे यांचे झाले. या कार्यक्रमासाठी मुंबई, ठाणे, पुणे येथे कामानिमित्त राहणारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्यावतीने हळदी कुंकू तसेच ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळ ठाणे, पुणे, मुंबई यांनी पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते.

Exit mobile version