प्रशांत नाईक, नृपाल पाटील यांची क्रिकेट स्पर्धेला सदिच्छा भेट

| सोगाव | वार्ताहर |

अलिशान कप 2023 भव्य प्रकाशझोतातील क्रिकेट स्पर्धेत सलग दुसर्‍या दिवशी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे.

यावेळी शेकाप नेते व अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे चेयरमन नृपाल पाटील, सासवणे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच संतोष गावंड, मापगाव ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, प्रशांत नाईक यांचे स्वीय सहाय्यक रवी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा अलिशान सोगाव संघातर्फे शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

Exit mobile version