। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील धाकटे वणगांव येथील गोपाळ थोरवये यांचे बुधवारी (दि.6) वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, बहिणी, सुना, नातवंडे, पंतवडे, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवारी (दि.15) श्री क्षेत्र तमनाथ येथे होणार आहेत. तसेच, त्यांचे उत्तरकार्य मंगळवारी (दि.19) वेणगांव-कर्जत येथील त्यांच्या निवास स्थानी होणार आहेत. यावेळी संदिप यादव यांचे सकाळी 10 वाजता प्रवचन होणारा असल्याचे थोरवे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.