तहसीलदारांना देण्यात आले निवेदन
। कोर्लई । वार्ताहर ।
आपल्या रास्त मागण्यांबाबत सांप्रत शासनाचे दुर्लक्ष होत असून चर्चा सत्रे, पत्रव्यवहारा मार्फत शासनास जागृत करूनही शासन दरबारी उदासीनता दिसून येत आहे. या विरोधात तीव्र संघर्षाचे रणशिंग फुंकण्यापुर्वी गुरूवारी (दि.6) धरण सत्याग्रहाचे आंदोलन करीत मुरुडमधील सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, नगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीतर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीचे निवेदन तहसीलदार रोहन शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहे.
नाशिक येथे 23 फेब्रवारी रोजी मध्यवर्ती संघटनेचे राज्य कार्यकारिणीची सभा पार पडली. सरकारच्या या उदासीन धोरणामुळे कर्मचारी-शिक्षकांमध्ये जो उद्रेक निर्माण झाला आहे, त्याकडे लक्षवेध करून घेण्यासाठी गुरुवारी (दि.6) राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी व शिक्षकांनी 2 तासांचे धरणे आंदोलन केले गेले. यादरम्यान, मुरूडमधील कामगारांनी देखील धरणे करत कर्मचारी समन्वय समितीतर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीचे निवेदन तहसीलदार रोहन शिंदे यांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, शासकीय-निमशासकीय कर्मचारी उपस्थित होते.