। म्हसळा । वार्ताहर ।
दिवाळी सणानिमित्त गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानतर्फे भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेस उदंड प्रतिसाद लाभला. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शूर मावळे यांच्या शौर्याची साक्ष देणारे असे हे किल्ले दिवाळीत अनेक ठिकाणी बनवले जातात. दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. हीच परंपरा जपण्याचा प्रयत्न म्हसळ्यातील गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान करत आहे.
या स्पर्धेच्या निमित्ताने पब्जी आणि कार्टूनच्या जगात वावरणार्या मुलांना शिवरायांचा इतिहास, गड-किल्ले यांची जवळून ओळख व्हावी, असा प्रयत्न प्रतिष्ठानकडून करण्यात येत आहे. या स्पर्धेचे यंदाचे आठवे वर्ष आहे.
या स्पर्धेत लहान गटातून, ओम शिर्के व प्रदिप आळू यांनी प्रथम, शांभवी दिवेकर व अनन्या कळस यांनी द्वितीय तरनक्ष खाताते व शौर्य खताते यांनी तृतीय क्रमांकाचे यश संपादित केले. यासोबत महंत बारटक्के यांनी चौथ्या तर गौरी खताते व शर्वरी खताते यांनी पाचव्या क्रमांकाचे यश संपादित केले.
यासोबतच मोठ्या गटात अनिरुद्ध कुडेकर यांनी प्रथम क्रमाकांचे यश संपादित केले असून, अथर्व म्हशिलकर, निल म्हशिलकर आणि ओमप्रसाद सुर्यवंशी यांना द्वितीय क्रमांक, हर्ष म्हशिलकर व वेदांत बोरकर आणि अलंकार म्हशिलकर व श्रवण म्हशिलकर यांंना तृतीय क्रमांक, विराज खताते आणि सुनिल घावट, मनिष भोई, अथर्व वार यांना चतुर्थ तर श्रेयस महाडिक आणि ओमकार चोगले यांना पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन करडे, संतोष कुडेकर, कौस्तुभ करडे, श्रेया करडे, तेजस माळी, समेळ सर, शुभम करडे, विशाल सायकर यांनी मेहनत घेतली.