| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमधील क्रांतिसूर्य हुतात्मा वीर भाई ऊर्फ विठ्ठलराव कोतवाल यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त नगरपालिकेकडून अभिवादन करण्यात आले. कोतवाल ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते या अभिवादन कार्यक्रमात उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या माथेरान मधील हुतात्मा वीर विठ्ठलराव कोतवाल यांच्या 111 व्या जयंतीचे औचित्य साधत मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या हस्ते हुतात्मा भाई कोतवाल यांच्या नौरोजी उद्यान येथील अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मशाल मिरवणूक काढण्यात आली.
![](http://krushival.in/grygrars/2023/12/bhai.jpg)
या वेळी माथेरानच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण ढेबे तसेच इतर शिक्षकांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. विद्यार्थ्यांनी अभिवादनपर गीते सादर करून हुतात्मा भाई कोतवाल यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी लोकशाहीर वैभव घरत यांनी देशभक्तीपर गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगरसेवक कुलदीप जाधव, कोतवाल ब्रिगेड अध्यक्ष रोहिदास क्षीरसागर कोतवाल यांचा पूर्ण परिवार व माजी शिक्षण सभापती दिनेश सुतार, प्रभारी अधीक्षक अंकुश इचके आणि नगरपालिका कर्मचारी, शाळेचे कर्मचारी, विद्यार्थी तसेच अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.