। खांब। वार्ताहर ।
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित विद्यार्थ्यांना ई-एज्युकेशनबाबत महत्त्वपुर्ण मार्गदर्शनपर कार्यक्रम श्रमिक विद्यालय चिल्हे येथे सर्वदूर शिक्षण व रायगड जिल्ह्याचा शैक्षणिक विकास या ध्येयातून कार्य करणार्या साई फाऊण्डेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने सदरील ई-एज्युकेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे तथा मुख्य मार्गदर्शक दिनानाथ जैस्वाल, डॉ.असिफ कासकर, दिपक जगताप, नरेंद्र माळी, मारूती तुपकर, महेश तुपकर आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी दिनानाथ जैस्वाल यांनी ई-एज्युकेशनबाबत महत्त्वपुर्ण मार्गदर्शन करताना संगणकाची प्रारंभिक माहिती, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तसेच संगणकाचे सुटे भाग, संगणक जोडणी आदींबाबत सविस्तर माहिती देऊन संगणकाचे ज्ञान ही काळाची गरज असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन संगणक साक्षर व्हावे. यासाठी सर्वतोपरी आमच्या वतीने करण्यात येणार असल्याचे डॉ.असिफ कासकर व मार्गदर्शक दिनानाथ जैस्वाल यांनी अभिवचन दिले.