। कोर्लई । वार्ताहर ।
शेतकर्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणार्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांनी नजिकच्या महा ई-सेवा केंद्रावर जाऊन शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावेत, असे आवाहन मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांनी केले आहे.
या योजनमुळे राज्यातील शेतकर्यांच्या कल्याणासाठी केंद्र, राज्य शासनाद्वारे राबविण्यांत येणार्या विविध योजनांचा लाभ शेतकर्यांना सुलभ, पारदर्शक पद्धतीने वेळेवर उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. तसेच, शेतकर्यांना स्वस्त कर्ज, उच्च-गुणवत्तेची कृषि निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. अॅग्रिस्टॅक योजनेद्वारे शेतकर्यांचे शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यासाठी आता राज्यातील सर्व महा ई-सेवा केंद्रावर सुध्दा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने सोमवारी (दि.20) अॅग्रिस्टॅक योजनेद्वारे शेतकर्यांचे शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यासाठी मुरुड तालुक्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र संचालकांचे प्रशिक्षण तहसिल कार्यालय मुरुड येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महा ई-सेवा केंद्र संचालकांना त्यांचे लॉगिन वरून अॅग्रिस्टॅक योजनेद्वारे शेतकर्यांचे शेतकरी ओळख क्रमांक कसे तयार करावे, याबाबतचे प्रशिक्षण तहसिलदार रोहन शिंदे यांनी दिले.