विवाहितेचा हुंड्यासाठी छळ

पती व सासूवर गुन्हा दाखल
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
बिबवेवाडी पुणे येथील महिलेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी पाली पोलीस स्थानकात महिलेच्या पती व सासूवर गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पाली पोलिसांनी दिली.
24 डिसेंबर 2020 रोजी लग्न झाल्यापासून आजपर्यंत पती व सासू लग्नामध्ये मोठी गाडी व पैसे दिले नाहीत, म्हणून तसेच महिलेच्या चारीत्रावर संशय घेवून वारंवार टोमणे मारणे व धमकी देवून तीला हाताबुक्याने मारहाण करून मानसिक व शारिरिक त्रास देत होते. ही महिला तीन महिन्याची गरोदर असताना तिच्या पोटाला हाताबुक्याने लाथेने मारहाण केली. त्या मारहाणीमुळे गर्भपात देखील झाला होता. तसेच सोन्याचे दागिने देखील परत केले नाहीत. याबाबत पाली पोलीस स्थानकात गु.र.नं. 80/2021 भा.दं.वि.क. 313, 498, 406, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती बोराटे करीत आहेत.

Exit mobile version