• Login
Saturday, June 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

विश्‍वचषक जिंकण्याचा हरमनप्रीतला विश्‍वास

Krushival by Krushival
September 25, 2024
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
विश्‍वचषक जिंकण्याचा हरमनप्रीतला विश्‍वास
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ऑस्ट्रेलियाला टक्कर देण्यासाठी सज्ज

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

‘आयसीसी’ जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज झाला असून ट्वेन्टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याची आमच्याकडे आता सर्वोत्तम संधी असल्याचे मत कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केले. तसेच जेतेपद मिळवायचे झाल्यास बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा अडथळा पार करावा लागू शकेल याची हरमनप्रीतला जाण असली, तरी त्यांचे आव्हान परतवून लावण्याची क्षमता आमच्या संघात असल्याचा विश्‍वास तिने व्यक्त केला.

संयुक्त अरब अमिराती येथे 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या महिलांच्या ट्वेन्टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ मंगळवारी मुंबईहून रवाना झाला. त्यापूर्वी मुंबईतच विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हरमनप्रीतसह महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार आणि निवड समितीच्या अध्यक्ष नीतू डेव्हिड उपस्थित होत्या. महिलांच्या ट्वेन्टी-20 विश्‍वचषकाला 2009 पासून सुरुवात झाली आणि तेव्हापासून भारतीय संघ केवळ एकदाच अंतिम फेरी गाठू शकला आहे. 2020 च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी हरमनप्रीतच भारतीय संघाची कर्णधार होती. तसेच 2017च्या एकदिवसीय विश्‍वचषकात अंतिम फेरीत हार पत्करणार्‍या भारतीय संघातही हरमनप्रीतचा समावेश होता. आता या कटू आठवणी पुसून टाकण्यासाठी हरमनप्रीत सज्ज झाली आहे. ”आम्ही आता सर्वोत्तम संघासह विश्‍वचषकात उतरणार आहोत. या संघातील खेळाडू बर्‍याच काळापासून एकत्रित खेळत आहेत. त्यामुळे आम्हाला एकमेकांची ताकद आणि कच्चे दुवे ठाऊक आहेत. हे आमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. गेल्या ट्वेन्टी-20 विश्‍वचषकात (2023 मध्ये) आम्ही उपांत्य फेरी गाठली होती, पण जेतेपदापासून दूरच राहिलो. यंदा आमच्याकडे विश्‍वविजेते होण्याची सर्वोत्तम संधी आहे. यापूर्वीच्या स्पर्धांच्या तुलनेत यंदा आमची तयारी अधिक चांगली झाली आहे. आम्ही छोट्या-छोट्या गोष्टींवर काम केले आहे. त्या मेहनतीचे फळ आम्हाला मिळेल अशी खात्री वाटते,” असे हरमनप्रीतने सांगितले.

जुलैमध्ये श्रीलंका येथे झालेल्या आशिया चषकात भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर भारतीय महिला संघाने स्पर्धात्मक सामना खेळलेला नाही. ट्वेन्टी-20 विश्‍वचषकाच्यादृष्टीने महिला संघाचे बंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) सराव शिबीर झाले. यात खेळाडूंची तंदुरुस्ती आणि क्षेत्ररक्षण यावर विशेष मेहनत घेण्यात आली. ‘आशिया चषकात आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. मात्र, एखाद्या दिवशी काही गोष्टी तुम्हाला हव्या तशा होत नाहीत. तेच आमच्याबाबतीत अंतिम फेरीत घडले. त्यानंतर आम्ही बर्‍याच गोष्टींबाबत चर्चा केली. खेळातील उणिवा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता विश्‍वचषकात आम्ही सर्वोत्तम खेळ करू आणि जेतेपद पटकावू अशी आशा आहे,’ असे हरमनप्रीतने नमूद केले. फलंदाजांवर पूर्ण विश्‍वास मुझुमदारआपली भूमिका चोख बजावण्याची क्षमता असलेल्या भारतीय संघातील फलंदाजांवर माझा पूर्ण विश्‍वास असल्याचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार म्हणाले. ‘आमच्या अव्वल सहा फलंदाज फार प्रतिभावान आहेत. त्यांच्या फलंदाजीच्या शैलीत विविधता आहे. ही बाब आमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तिसर्‍या क्रमांकावरील फलंदाजाची भूमिका सर्वांत महत्त्वाची असल्याचे मी मानतो. या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हे मला ठाऊक आहे. मात्र, आम्ही सामन्याच्या दिवशीच याचा खुलासा करू,’ असे मुझुमदार यांनी सांगितले. तसेच दुबई येथील खेळट्ट्यांकडून चेंडूला अधिक उसळी मिळेल. यासाठी आम्ही तयार असायला हवे, असेही मुझुमदार म्हणाले.

Related

Tags: Harman Preetindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernew delhinewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssportssports newsworld cup
Previous Post

महेश निकम यांना मातृशोक

Next Post

शहरातील समस्यांचे निवेदन नगरपरिषदेकडे

Krushival

Krushival

Related Posts

फिफा नफ्यात; यजमान तोट्यात
क्रीडा

फिफा नफ्यात; यजमान तोट्यात

June 19, 2026
लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात
उरण

लखनौ येथे तायक्वांदो पंच सेमिनार उत्साहात

June 18, 2026
खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम
क्रीडा

खांदा कॉलनीतील मैदानांवर फुटबॉलप्रेमींची धूम

June 18, 2026
युद्धसमाप्तीनंतरही विश्वचषक लढतीत तणाव
क्रीडा

युद्धसमाप्तीनंतरही विश्वचषक लढतीत तणाव

June 18, 2026
वैभव सूर्यवंशीशी पंगा घेणं पडलं महागात
क्रीडा

वैभव सूर्यवंशीशी पंगा घेणं पडलं महागात

June 18, 2026
भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू
sliderhome

भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू

June 17, 2026
Next Post
शहरातील समस्यांचे निवेदन नगरपरिषदेकडे

शहरातील समस्यांचे निवेदन नगरपरिषदेकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?