। पोयनाड । प्रतिनिधि ।
पोयनाड विभाग तलाठी सजाचे मंडळधिकारी महेश लक्ष्मण निकम यांची आई सुमती लक्ष्मण निकम (85) यांचे 17 सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. अलिबाग तालुक्यातील महसूल विभागाचे सर्व अधिकारी व तलाठी, कर्मचारी यांनी निकम यांच्या मातोश्री यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांचे दशक्रिया विधी गुरूवारी (दि.26) सकाळी 8.00 वाजता नारंगी भुनेश्वर येथे होणार आहेत. तसेच, तेराव्याचे विधी रविवारी (दि.29) अलिबाग गोंधळपाडा येथील बे-वूड्स सोसायटीत होणार आहेत.