| इंदापूर | प्रतिनिधी |
इंदापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम ठोकत पवार गटात प्रवेश केला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी घेतल्याने आता इंदापुरात भाजपला मोठे खिंडार पडले आहे. इंदापूरमध्ये सोमवारी शरद पवार गटाची जाहीर सभा पार पडली. या सभेत हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी शरद पवार गटात जाहीरपणे पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते. तसेच सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, उत्तमराव जानकर हेदेखील व्यासपीठावर हजर होते.