| अलिबाग | प्रतिनिधी |
साखरचौथ गणेशोत्सवनिमित्त ओमकार क्रीडा मंडळ वेश्वी, लायन्स क्लब अलिबाग, मुंबई येथील दोस्त फाऊंडेशन, जिल्हा रुग्णालय आणि ग्रामस्थ मंडळ वेश्वी यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्वी येथील मराठी शाळेत मोफत आरोग्य शिबीर, मोफत मोतीबिंदू चिकित्सा शस्त्रक्रिया याचबरोबर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील 115 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला, तर 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिक विष्णू मगर आणि सदानंद शेळके यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी गजानन नाईक, राघव गुरव, सुभाष पाटील, विद्यमान उपसरपंच आरती पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनंत मुलूस्कर, राजन राऊळ, मृदुला मगर, जुई शेळके, रुपाली गुरव यांच्यासह सुरेश शेळके, गजानन राऊळ, कृष्णा धनवी, पद्माकर पाटील, संदीप घरत, सुरेंद्र शेळके, निलेश मगर, ओमकार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, सचिव गिरीश शेळके, लायन्स क्लबच्या अध्यक्षा गौरी म्हात्रे, डॉ. शीतल स्वामी, मंडळाचे सदस्य राकेश राऊळ, प्रशांत राऊळ, निकेश शेळके, अंकित शेळके, अतिष पाटील, विरेंद्र मगर, हेमंत नाईक, सुशांत नलावडे, प्रसाद मगर, केदार नलावडे, किरण गुरव, प्रतीक गुरव, पंकज गुरव, महेश मुलूस्कर, अमित मुलूस्कर, स्वप्नील शेळके, संकेत शेळके, ओमकार नलावडे, रोहित मिंडे, जितेंद्र गुरव, ग्रामस्थ मोठ्यया संख्येने उपस्थित होते.