| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर मधील उद्यानात सिमेंटच्या बेंच खाली चिरडून चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
गिरीराज सोसायटी प्लॉट नंबर 36 येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी करत असताना प्रकाश विश्वकर्मा याची मुलगी ब्रीजा प्रकाश विश्वकर्मा (4) ही आपल्या वडिलांसोबत उद्यानात गेली होती. परंतु तो उद्यानातील दिवस तिचा शेवटचा दिवस ठरला. ब्रिजा उद्यानामध्ये खेळत असताना ती बेंचवर बसण्याकरता गेली परंतु बेंच हलत असल्याने तोच बेंच ब्रिजाच्या अंगावर पडला. अंगावर बेंच पडलेला बघून ब्रिजाच्या वडिलांना धक्का बसला तात्काळ त्यांनी बेंच उचलून साईटला केला. परंतु अंगावर पडलेल्या सिमेंट बेंचच्या भारी वजनामुळे ब्रिजाने जागीच आपला जीव गमावला. या मुलीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी ब्रिजाला मृत घोषित केले.